पाथर्डी : करंजी परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिक घरातच अडकून पडले आहेत. काही जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पू रामुळे गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. करंजीकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पाथर्डी आगारातील मुंबई–पाथर्डी, कोल्हापूर–पाथर्डी आणि कल्याण–पाथर्डी या एसटी गाड्या करंजी घाटात अडकून पडल्या आहेत. प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गावात वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मदतकार्य सुरू केले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
अशाच अधिक अपडेट्ससाठी सनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सुरक्षित राहा, सजग राहा!
Post a Comment