पंचनामे यांचा फार्स न राबवता तातडीने मदत करा - माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर ः परतीच्या पावसाने अहिल्यानगर व मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी मा. महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून नागरिकांना धीर दिला याचबरोबर आता पंचनामे व इतर फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मोठी मदत करा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.


संगमनेर तालुक्यातील सादतपूर, निमगाव जाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत सोमनाथ जोंधळे, विवेक तांबे,अनिल थेटे, तानाजी जोंधळे, चिंचपूरचे सरपंच सागर तांबे, संदीप कडलग,लक्ष्मण डेंगळे, अनिल तळोले, विजय हिंगे, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हे बिहार पाटणा येथे उपस्थित होते. परंतु महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थिती नंतर तातडीने त्यांनी मराठवाड्यातील संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव भागामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. याचबरोबर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली.याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यानंतर आज संगमनेर तालुक्यातील सादतपूर व निमगाव जाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली सादतपूर येथे रात्री झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. कुटुंब उघड्यावर पडली आहे. पशुधन अडचणीत आले आहे. ही बातमी कळताच सकाळी सात वाजता थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी कार्यकर्त्यांसह सादतपूर येथे भेट देऊन नागरिकांना मदत केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post