अहिल्यानगर -मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार (ता.पाच) रोजी दुपारी शहरातील तपोवन रोड परिसरात ही घटना घातला. जखमी सक्षम नवघरे (रा. भूषणनगर, केडगाव) हा चास येथील महाविद्यालयात कॉम्प्युटर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
नवघरे व त्याचा मित्र नयन खेचे याला पडका महाल परिसरात काही जणांनी मारहाण केली होती. याची माहिती मिळताच सक्षम त्याच्या मदतीसाठी घटनास्थळी गेला. मात्र नयनला गाडीत बसवून नेत असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीचा मार्ग अडवून सक्षमवर कोयता व लोखंडी रॉडने हल्ला चढवला. ‘तुला आज जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत जॉय सोनवणेने कोयत्याने, अनुज बोरुडेने लोखंडी रॉडने, तर इतरांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जॉय सोनवणे, अनुज बोरुडे, जॅकी उर्फ धीरज, साहिल दरेकर, अमन वाबळे, पिंट्या बकासूर व भोऱ्या (सर्व रा. पवन नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment