स्पर्धा परिक्षांचा पालकांसह विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप... जिल्ह्यासह राज्यातील घटना

अहिल्यानगर ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसह माध्यमिक शाळेतील इयत्तास विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. शिष्यवृत्ती व नवोदयच्या धर्तीवर ही परीक्षा होत आहे. मात्र या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊनही त्यांना पुस्तके व प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार पालकांमधून होत आहे. याबाबत शिक्षण विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.


राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेसह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. यासाठी पुस्तकांसह सहाशे ते सातशे रुपये शुल्क आकारला जात आहे. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसविले जात आहे. या परीक्षेचे आयोजन दरवर्षीच केले जात असले तरी या आयोजनात आता त्रुटी राहत असल्याचे समोर आलेले आहे. 

परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संबंधित यंत्रणा शुल्क आकारात आहे. हे शुल्पक परीक्षा फाॅर्मसह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे पुस्तके त्यात उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु मागील काही दिवसांपासून संबंधित यंत्रणेने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहे. राज्यभरातील काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. तर काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाही. 

याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून सारवासारव केली जात आहे. परंतु तरीही पुस्तके दिली जात नसल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शासन मान्यता नसलेल्या अशा परीक्षांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा अशा परीक्षा आयोजनास मज्जाव करावा, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post