पुणे : राज्य सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत आता परीक्षा घेण्याची पद्धत बदलली असून, २०२६ पासून इयत्ता पाचवी आणि आठवी वीऐवजी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. यंदाच्याच शैक्षणिक सत्रापासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.
महाराष्ट्रतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.
यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेतली जात होती. मात्र २०१६-१७ पासून आरटीई कायद्यानुसार या परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता आणि ती पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थासाठी लागू करण्यात आली.
तथापि, या शैक्षणिक बदलांमुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्याथ संख्या घेतल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्रीनी पूर्वीप्रमाणेच इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारित परीक्षा पद्धत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

Post a Comment