बीड : श्री वृध्देश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक जे. आर. पवार हे सेवानिवृत्त होत आहे. निमित्ताने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
पिंपळा (ता-आष्टी) २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हा सोहळा पांडुरंग मंगल कार्यालयात होणार आहे. या सोहळ्यास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पद्मश्री पोपटराव पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मोनिकाताई राजळे,आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे साहेब,.साहेबराव दरेकर, बाळासाहेब (काका)आजबे , डॉ. एस. बी. निमसे आदी उपस्थित राहणार आहेत.
सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारनातील दांडगा अभ्यास, कामावरील निष्ठा, आरोग्यदूत, दानशूर म्हणून ओळखले जाणारे सामाजिक बांधिलकी हेच ब्रीद जपणारे जे. आर. पवार यांनी शासकीय तलाठीची नोकरी सोडून सुरवातीला कडा कारखाना आणि नंतर त्यांनी 38 वर्ष श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दादा पाटील राजळे महाविद्यालयाची संचालक पदाची धुरा देखील सांभाळली.
एकूण ४८ वर्ष सेवा करून वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना येथून कार्यकारी संचालकपदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेेले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रदिप थोरवे यांनी केले आहे.

Post a Comment