संगमनेर ः विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ विजयी झालेले आहे. तेव्हापासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रथम होत आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील, असे बोलले जात असले तरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लक्ष घातले तरच होतील, नाही तर संगमनेर कारखान्यासारखी अवस्था होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
संगमनेर नगर परिषदेचे आरक्षण महिला खुला प्रवर्गासाठी निघालेले आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. ही आरक्षण सोडत झाल्यानंतर विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. परंतु या निवडणुकीची रणनिती काय असणार हे स्पष्ट केलेले नाही.
संगमनेर कारखाना निवडणुकीच्या वेळीही त्यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. आता तशीच परिस्थिती होऊ नये, म्हणून कार्यकर्ते सावध झालेले आहे. अनेकांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.
संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लक्ष घातले तरच ही निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यांनी जर या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले तर संगमनेर कारखान्यासारखी अवस्था होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काहींनी आता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. नगराध्यक्षपद जनतेतून असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. ही निवडणूक माजी मंत्री महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. तशीच ही आमदार अमोल खताळ यांच्यासाठीही प्रतिष्ठेची राहणार आहे.

Post a Comment