नेवासा नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आज; डॉ. करणसिंह घुले पदभार स्वीकारणार


नेवासा : नेवासा नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दोन जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नेवासा नगरपंचायत कार्यालय येथे पार पडणार आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यासह सर्व नगरसेवक या सोहळ्यात पदभार स्वीकारणार आहेत.


या कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती युतीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

शहरातील मायबाप जनतेने भाजप-शिवसेना युतीला दिलेला जनादेश हा विकासाच्या अपेक्षांचा असल्याचे नेतृत्वाकडून सांगण्यात आले."ही सत्ता जनतेची व जबाबदारी सेवेची आहे," अशी भूमिका नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी व्यक्त केली.

पदग्रहणाच्या अनुषंगाने नगरपंचायत कार्यालय परिसरात सजावट, स्वागत मंडप, बॅनर आणि नागरिकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे. महायुतीचे नेते, कार्यकर्ते, मित्र, स्वयंसेवक तसेच सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post