साईज्योती प्रदर्शनात अनेक स्टॉल रिकामे...


अहिल्यानगर: साईज्योती सरस उमेद महिला बचत गटाच्या  प्रदर्शनाबाबत सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद, अहिल्यानगर व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाच्या नियोजनात मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याचा आरोप होत आहे. अपुऱ्या नियोजनामुळे अनेक बचत गट सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वस्तू विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक स्टॉल रिकामे राहिलेले आहेत.

या प्रदर्शनात मर्जीतील बचत गटांना स्टॉल देण्यात आल्याने इतर गटांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी फूड स्टॉलवरील काही खाद्यपदार्थांचा दर्जाही खालावलेला असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आल्या. 

या तक्रारी बचत गटाशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्याकडेही करण्यात आल्या. परंतु त्यांनी तक्रारदारांची खिल्ली उडविल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे अनेकांनी या प्रदर्शनस्थळीच त्या अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  याबाबत काहीनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. 

एकूणच अपुऱ्या नियोजनामुळे आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे साईज्योती सरस २०२६ या प्रदर्शनाचा अपेक्षित उद्देश साध्य झाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रदर्शनात चहापेक्षा किटल्यांचा खडखडा झाला आहे.  यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काहींनी प्रदर्शनस्थळी बचतसगटांच्या स्टॉलला चांगली सुविधा नसल्याच्या तक्रारी केल्या. काही नागरिक खाद्यस्टॉलकडे जाताना पडल्याच्या घटना घडल्या. याबाबत बचत गटाचे काम पाहणार्या एका कॉन्ट्रक्टवर असलेल्या अधिकार्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी मोठ्या कार्क्रमात असे प्रकार होतच असतात असे सांगून तक्रारदारांना गप्प केल्याची चर्चा बचतगट स्थळी होती.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून काही अधिकारी स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहे. ही प्रसिद्धी मिळून या अधिकारी नेमकं काय साध्य करतात असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे जिल्हाभरातून येणाऱ्या बचत गटांना सुख सुविधा देण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याऐवजी ते स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहे. कामे चांगली केल्यानंतर त्याचे कौतुकच होत असते मात्र बचत गटाच्या प्रदर्शनात काही चुकीची कामे केली आहेत हे भेट दिल्यानंतर स्पष्ट होत असल्याची चर्चा बचत गटातील महिलांमधून होत आहे. 

विशेष म्हणजे एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेतील एका पदाधिकाऱ्याने स्टॉलची मागणी केली होती परंतु त्यांनाही स्टॉल देण्यात आलेले नाही त्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर तशी नाराजीची पोस्ट ही व्हायरल केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post