सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना लि., सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेल पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता २४ जून) सकाळी साडेनऊ वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला माजी मंत्री आ. शंकरराव गडाख पाटील हे प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन करणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी मुळा उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार यशवंतरावजी गडाख राहणार आहेत. या प्रचार सभेद्वारे सहकार पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करण्यात येणार आहे.
करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक व ज्ञानेश्वर रामराव दरंदले, तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातून कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे हे सहकार पॅनेलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सहकार पॅनेलच्या वतीने सर्व सभासद, ऊस उत्पादक व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने प्रचार सभेस उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन अध्यक्ष, सहकार पॅनेल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, दोन्हीही पॅनेलकडून प्रचाराला वेग आला आहे. त्यातच सहकार पॅनेलच्या या प्रचार सभेकडे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment