ग्रामीण भागाच्या विकासासाठी माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांनी सहकाराची चळवळ महाराष्ट्रात राबवीण्यासाठी प्रयत्न केले सहकारी साखर कारखानदारी, बॅंका,पतसंस्था, सहकारी बँकेच्या माध्यमातून कृषी उद्योग, फलोद्यान सहकारी संस्था यांच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले. पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना काढून सहकाराची मुहूर्तमेढ केली. देशातील हा पहिला साखर कारखाना ठरला सहकार हा ग्रामीण भागाचा विकासाचा पाया ठरला. १९६५ ते १९७२ चा कार्यकाळ पारनेर तालुक्यातील विशेष करुण निघोज आणी परिसरातील जनतेसाठी मोठा कठीण होता.
दहावी उत्तीर्ण होणारा युवक शिक्षणासाठी पारनेर, शिरुर किंवा पुणे नगर या ठिकाणी नव्हे तर कुलाबा येथील मच्छि व्यवसायिक होण्यासाठी जात असत ही काळाची गरज होती. त्याच वेळी कुलाबा येथे गेलेले कोनतीही व्यक्ती असो ती निघोज किंवा तालुक्यातील असो किंवा जिल्ह्यातील असो किंवा बाहेरील त्यांना आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने निघोज ग्रामस्थ संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी केले. रामभरोसे हॉटेलच्या माध्यमातून स्व.कवाद यांनी कुणाकडे चहा पाणी नाष्टा करण्यासाठी पैसा असो वा नसो सर्वांनाच आधार दिला.
बॅंकाची संख्या अत्यल्प आणी त्यात ही अशिक्षित असल्याने शे दोनशे रुपये ठेवायचा कोठे हा प्रश्न निर्माण व्हायचा राहायला घर नाही हातगाडी हेच आपले घर अशी त्यावेळी परस्थीती, मात्र रामभरोसेच्या काउंटरवर असलेले बाबासाहेब कवाद हीच आपली बॅंक हे कुलाबकरांचे समीकरण ठरलेले असायचे. पैसे स्व. कवाद यांच्याकडे दिले की लोक निर्धास्त असायची. स्व. कवाद हेच पैसे पुडीत ठेवायचे त्यावर संबंधित व्यक्तीचे नाव टाकायचे तसेच तिच पुडी रामभरोसे काऊंटर मध्ये सुरक्षीत राहायची महिना दोन महिन्यांनी घरी निघोजला यायचे म्हटले की तीच शेपाचशे हजार रुपयांची पुडी घेऊन गावी यायचे काय ती विश्वासाहर्ता, जनतेची विश्वासू बॅंक म्हणजे रामभरोसे हॉटेल आणि बाबासाहेब कवाद म्हणजे ही विश्वसनीय बॅंक चालवणारे एक सदगुणी व्यक्तीमत्व, असे समीकरण त्यावेळी तयार झाले होते.
फारच स्वस्ताईचा काळ असल्याने हजार दोन हजार रुपये म्हणजे जास्त पैसा. स्व. कवाद याच विश्वसनीय नावाचा आधार घेत जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी मुंबई येथे ६ ऑक्टोबर १९७३ रोजी अहमदनगर बॅंकेची मुंबई येथे स्थापना केली आणी पुडीतील त्या काळातील लाखो रुपये जी एस महानगर बॅंकेत शेकडो लोकांना सभासद करीत स्व.कवाद यांनी बॅंकेत सुरक्षित ठेवीत पारनेर तालुक्यातील बहुसंख्य लोकांना सहकार चळवळीतील बॅंकेचा खऱ्या अर्थाने लाभ मिळवून दिला. शेळके साहेब हे बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष व स्व. बाबासाहेब कवाद हे बॅंकेचे संस्थापक उपाध्यक्ष अशा या जोडीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगर बॅंक, महानगर बॅंक ते जी एस महानगर बॅंकेचा कारभार खऱ्या अर्थाने गोरगरीब गरजू लोकांना सहकारातील पहिल्या बॅंकेचा लाभ मिळवून दिला आज मितीला या बॅंकेचा कारभार हजारो कोटींत वाढला आहे.
स्व. शेळके साहेब व स्व कवाद यांचे नाव बॅंकेच्या माध्यमातून अजरामर झाले असून त्यानंतर पारनेर सहकारी साखर कारखान्यातील त्यांचे योगदान, निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी अविस्मरणीय ठरली आहे. बाबासाहेब कवाद यांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असले तरी निघोज ग्रामीण संस्था परिवाराच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आज हजारो कुटुंबांच्या आधारस्तंभ ठरल्या असून म्हणूनच स्व.कवाद हे सहकारातील दीपस्तंभ आहेत. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था, बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था या समाजाभिमुख संस्था म्हणून नावलौकिकास पात्र ठरल्या आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून आज शेकडो कुटुंबाना आर्थिक आधार मिळाला आहे हजारो कुटुंबे आज या पतसंस्थेच्या माध्यमातून उभी राहिली आहेत. फलोद्यान संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम झाले आहे. शेतकरी विकासाचे केंद्र म्हणून फलोद्यान संस्थेकडे आज जनता जनार्दन पाहात आहेत. बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून न्यु इंग्लिश स्कूल उभे राहीले आहे इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आज राज्यात विविध विभागात ते माजी विद्यार्थी प्रगती करीत आहेत.
स्व.कवाद यांनी स्थापन केलेली आणखीन एक संस्था म्हणजे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट या संस्थेचा कारभार आज राज्यात नावलौकिकास पात्र ठरला आहे. तिर्थक्षेत्र माध्यमातून होणारा राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मंदीर परिसर विकास, जगप्रसिद्ध रांजणखळगे हे पर्यटनदृष्ट्या विकसीत होत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यामध्ये विशेष करुन खासदार नीलेश लंके यांनी या पर्यटन आणी मळगंगा देवी तीर्थक्षेत्रासिठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. विसावा पर्यटक हॉल माध्यमातून राज्यातील पर्यटकांची निवास व्यवस्था व भोजन कक्ष या ठिकाणी तयार झाले आहे.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना करताना ट्रस्ट माध्यमातून तिर्थक्षेत्र अंतर्गत तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड पर्यटनदृष्ट्या विकसीत झाले पाहिजे ही संकल्पना ठेऊन ट्रस्ट स्थापना त्यांनी केली. मळगंगा मंदीराजवळ शरद पवार यांच्या नावाने अभ्यासिका म्हणून ईमारत उभी राहिली. खासदार नीलेश लंके यांनी आमदार असताना या इमारतीसाठी तब्बल एक कोटी तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. अतिशय सुसज्ज अशा या इमारतीत ट्रस्ट कार्यालय आहे. सभागृह आहे तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे.
गेली चार वर्षांच्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थी या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत पंचक्रोशीतील शैक्षणिक विकास साधण्यासाठी या अभ्यासिकेचा खऱ्या अर्थाने गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ झाला हीच शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी स्व. बाबासाहेब कवाद यांनी हयातभर योगदान दिले. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी स्व. कवाद यांचे शैक्षणिक संस्कृतीचे स्वप्न पूर्ण केले.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाच्या माध्यमातून आज रोजी शेकडो गरीब व गरजू लोकांना व राज्यातून येणाऱ्या भाविकांना अगदी अल्पदरात फक्त वीस रुपयांत जेवण उपलब्ध होत आहे. बाबासाहेब कवाद यांच्याकडे कुणीही गरीब गेला तरी तो कधीही उपाशी पोटी परत येत नव्हता दहा पाच रुपये देऊन ते त्याच्या नाष्ट्याची किंवा जेवणाची व्यवस्था करीत होते. हीच संकल्पना ठेऊन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने हे प्रसादालय सुरू केले आहे.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने सरकारवाडा जागेवर बांधलेले व्यापारी संकुल किंवा त्याच इमारतीत असलेली भाविक निवास व्यवस्था ही स्व.कवाद यांचीच संकल्पना अतिशय मुबलक दरात सुरू आहे. आपला कारभार लोकाभिमुख व लोक विकासासाठी झाला पाहिजे ही स्व.कवाद यांचे स्वप्न होते ते आज मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट असो किंवा जी एस महानगर बॅंक, तसेच निघोज ग्रामीण संस्था परिवार यांच्या माध्यमातून साकार होत आहे.
जी एस महानगर बॅंकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ कवाद, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद सर, निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्व बाबासाहेब कवाद यांचे विचार व निस्वार्थी आचरण याचे अनुकरण करीत या सर्वच संस्थाचा कारभार लोकाभिमुख व लोकविकास होण्यासाठी सक्षमपणे काम करीत आहेत. स्व. कवाद यांचा सहकारातील वारसा चालवीण्यासाठी ही सर्वच नेतेमंडळी अतिशय कार्यक्षमपणे काम करीत आहेत हीच कामाची खरी पावती असून समाजासाठी अहोरात्र मेहनत करून सर्वाधिक योगदान देणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब कवाद यांना आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली.
- दत्तात्रय बबनराव उनवणे, कार्याध्यक्ष पारनेर तालुका पत्रकार संघ

Post a Comment