नगर : राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची शनिवारी (दि.20)ला सकाळी 10 वाजता वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील टिळक रस्ता येथील श्रमिक कार्यालयात संघटनेची सध्याच्या परिस्थिती व विविध प्रश्नावर चर्चा होणार आहे.
या बैठकीस केंद्रीय कार्याध्यक्ष सुधाकर गुजराती (नाशिक) हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे आनंद वायकर उपस्थित राहणार आहेत.
संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बलभिम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदींनी आवाहन केले आहे.

Post a Comment