विनामास्क फिरणार्यांनो कोरोनाचा आकडा पहा एकदा...

नगर : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात मंगळवारच्या बुधवारी रुग्णात वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आज (मंगळवारी) १४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

 आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ९३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३७ टक्के इतके झाले आहे. 

जिल्ह्यात आज अखेर ७३ हजार ८७९ कोरोना बाधीत आढळून आलेले आहेत. त्यातील 71 हजार 939 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. एक हजार 119 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. दिवसभरात आज ११४ ने वाढ झालेली आहे. सध्या  ८२१ जणांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात  नऊ,  खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात  ८४ व अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post