मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापे टाकून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत आली आहे. एक कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत.
राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी हे प्राधान्य लक्षात घेऊन, त्यांच्या दैनंदिन आहारातील अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकण्याची प्रक्रिया राबवते.
मुंबई व पालघर परिसरातील काही खाद्यतेल व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले.
या छाप्यात मुंबईतील मे. ऑईल वेल ऑईल सेंटर, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई-43, मे. जि.के.ऑईल सेंटर, जि.एम.लिंक रोड, गोवंडी, मुंबई -43 व पालघर जिल्ह्यातील, मे. ओमकार ट्रेडींग कंपनी, सातीवली, वसई, जि. पालघर, मे. शिवाय ट्रेडींग कपंनी, सातीवली, वसई पूर्व, जि. पालघर या चार खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई घेण्यात आली.


Post a Comment