नगर : मोटारसायकलवरील आलेल्या दोन अनोळख्या इसमांनी 62 वर्षीय वृध्देस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलीत करुन तिच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र हिसकावून ओढून तोडून धूम ठोकली.
ही घटना शिलाविहार येथील अमेया अपार्टमेंटच्या पार्कींमध्ये गुरुवारी (दि.19) रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.
भाग्यश्री अरुन भणगे (वय 62, रा. अमेय अपार्टमेंट, शिलाविहार रोड, सावेडी) या त्यांच्या नातीला अपार्टंमेटच्या पार्कीमध्ये खेळवित असताना मोटारसायकवरुन आलेल्या. अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला व त्यांच्या हातात कादाची चिठ्ठी देऊन हा पत्ता कोठे आहे, असे विचारले भणगे पत्ता सांगत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र हिसकावून चोरुन नेले.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली आहे.
Post a Comment