म्हसे यांच्या अर्जाची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

 


राहुरी : महावितरण कंपनीने रोहित्र बंद करून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून याबाबतचा पत्रव्यवहार ऊर्जा खात्याकडे पाठविण्यात आला आहे.

मुख्यंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मधुकर  म्हसे यांनी म्हटले आहे की, महावितरण कंपनीने रोहित्र बंद करुन शेतीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आहे. 

अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीज बिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे.

 "शेती पंपाचे वीजबिल भरा नाहीतर रोहित्र बंद "अशी सक्ती लावली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता, त्यांची परिस्थिती न पहाता रोहित्र बंद करून वीज पुरवठा बंद  केला जात आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे.अशी शेतकऱ्यांमध्ये आपल्या सरकारविषयी भावना तयार झाली आहे. अशीच  वसुली सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही.

त्यामुळे शेतकर्यांना वीज माफी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याची दखल घेण्यात आली आहे. आता उर्जा खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post