डॉक्टर कुटुंबियाने जीवनयात्रा संपवली...

कर्जत : राशीन येथील  डॉ. महेंद्र थोरात (वय 46) यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

शनिवारी पहाटे ही घटना घडली. गळफास घेतलेल्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली आहे.  प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी आत्महत्या की घातपात? हे पोलीस तपासात समोर येईल. 

दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉ. महेंद्र थोरात यांनी म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा (वय18) कृष्णा याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. त्यामुळे आमचे जीवन संपवित असल्याचे त्यात म्हटले आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post