व्हॅलेंटाईन डेपासून फिरणार्या त्या व्हीडीओ चे सत्य पहा...

व्हॅलेंटाईन डेची तरुणाई आतुरतेने दरवर्षीच वाट पहात असताे. हा दिवस स्मरणीय रहाण्यासाठी प्रत्येक प्रेमी प्रयत्न करीत असताे. अशाच एका प्रेमीयुगालाचा व्हीडीओ सध्या साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. या व्हीडीओतून अनेकांना आदर्श घ्यावा, असेच हे एक दाम्पत्य आहे. समाजात एकमेकात पटत नाही म्हणून काडीमाेडसाठी न्यायालयाची पायरी चढणार्या दाम्पत्याच्या डाेळ्यात अंजन घालणारीच ही प्रेम कहाणी आहे. 

लग्नाचा रेशीम गाठी बांधल्यानंतर हे कुटुंब एकत्र आलेले असून संसाराची प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांना साथ देत यांचा संसार फुलला असून त्यांच्यातील प्रेम वाढत गेलेले आहे. 

या प्रेमीयुगालाची समाजमाध्यमावर सध्या जाेरदार चर्चा सुरु आहे. एकमेकांना वृध्द दाम्पत्य फूल देत असलेला व्हीडीओ असून ताे नेमका कुठला आहे, याचा बाेध हाेत नसल्याने अनेकांनी प्रयत्न केला. पण ताे निष्फळ ठऱला आहे.  निष्फळ ठरलेला असला तरी वृध्दपकाळातील त्यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पध्दत मात्र प्रेमीयुगलांसाठी आदर्श ठरत आहे. 

राहाता तालुक्यातील ममदापूर या गावातील हा व्हेलेंटाईन डे साजरा करणार्या वृध्ददाम्पत्याचा व्हीडोओ असून त्याची समाजमाध्यमावर सध्या जाेरदार चर्चा सुरु अाहे. कारभारी भालेराव व इंदुबाई भालेराव या दाम्पत्याची प्रेम कहाणी व्यक्त करणारा हा व्हीडीओ आहे. या व्हीडीओतून या प्रेमीयुलाच्या 71 वर्षाची प्रेम कहाणी आता समाजासमाेर येत आहे.

भालेराव दाम्पत्याच्या संसाराची वेल चांगलीच बहरलेली आहे. या दाम्पत्याच्या या वेलीवर दाेन कळ्या व दाेन फुले उमललेली असून या कळी व फुलांची चांगली जपणूक करत यांनी त्यांना उच्चपदापर्यंत पोहचविलेले आहे. 

घरची परिस्थिती तशी बेताचीच हाेती. एकाच्या कष्टातून येणार्या पैशातून घराचा चरितार्थ चालविणे तसे अशक्य हाेते. त्यामुळे आपल्यालच कारभार्याच्या हाताला मदतीचा हात इंदुबाईंनी देत कष्ट करण्यास सुरवात केली. स्वतःला जमीन अ्सूनही नसल्यासारखीच असल्याने त्यांनी थेट दुसर्याच्या शेतावर कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देऊन माेठे करण्याचे उराशी स्वप्न बाळगलेले होते. 

येथे क्लीक तर करा : न्यूयॉर्कमध्ये रंगला शिवजयंती सोहळाhttps://www.tejwarta.com/2021/02/Jayanti.html

ते स्वप्न त्यांचे सत्यात उतरलेले आहे. त्यांचा आज एक मुलगा बबनराव भालेराव मुख्याध्यापक म्हणून काेपरगावातील शामवाडी शाळेवर अध्यापनाचे काम करीत असून एक मुलगा शेती करीत आहे. दाेन्ही मुलींचे लग्न झालेले असून त्या सुखाने संसार करीत आहे. बबनराव यांची पत्नी मीनाक्षी भालेराव याही शिक्षिका आहे. 

या दाम्पत्याने मुलांचे भविष्य घडविताना येणार्या प्रत्येक अडचणीवर मात करीत शिक्षणाचे धडे देण्यात कमी पडले नाही. बबनराव भालेराव यांना डीडीएडला नंबर लागला तेव्हा त्यांच्याकडे महाविद्यालयात जायला पैसेही नव्हते. आईने जेव्हा गवताचा भारा विकला तेव्हा त्यांना तिकिटाचे पैसे मिळाले. 

आई-वडिलांचे कष्ट बालपणापासूनच पाहिल्याने बबनराव यांनीही पैशांची काटकसर करत शिक्षक हाेण्याचे धैय उराशी बाळगून धडे गिरविले. आई-वडिलांच्या कष्टाला व त्यांच्या मेहनतीला फळ मिळाल्यानेच ते डीएडची परीक्षा उत्तीर्ण हाेत त्यांना प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळाली.

बबनराव शिक्षक झाल्याने भालेराव कुटुंबाचे दुःखाचे दिवस संपून त्यांना सुखाचे दिवस आले हाेते. बबनराव यांचे लग्नही मीनाक्षी यांच्याबराेबर झाले. त्याही शिक्षिका असल्याने भालेराव कुटुंबियांना आणखीच आनंदाचे दिवस आले. नेहमीच काटकसरीत व कष्टमय जीवन जगलेल्या कुटुंबाला आज सुखाचे दिवस आलेले असले तरी ते गवताच्या पेंढ्यांना अद्यापही विसरलेले नाही. 

सर्वजण गुण्यागाेविंदाने राहून समाजासमाेर एक आदर्श निर्माण करीत आहे. याच कुटुंबियांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्यांच्या लग्नाचा 71 वी चिरकाल स्मरणात राहण्यासाठी व्हेलेंटाईन डेला या दाम्पत्याला एकमेकांना फूल देतानाचा व्हीडीओ तयार करून त्यांच्यातील एकमेकांचे प्रेम दाखवून सुखाने असाही संसार हाेऊ शकतो, हे समाजासमाेर आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

या त्यांच्या प्रयत्नाची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा झडत असून या वडीलधार्यांनी एकमेकांची बांधून दिलेली गाठ प्रत्येक प्रसंगात अबाधीत ठेवत एकमेकांना साथ देत जीवनाचा प्रत्येक टप्पा पार करणारे हे दाम्पत्य आज समाजासाठी खरच आदर्श ठरत आहे.

- एम. व्ही. देशमुख

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post