न्यूयाॅर्कमध्ये रंगला आॅनलाईन शिवजयंती साेहळा

 

न्यूयॉर्क : गेल्या आठ वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशनच्या माध्यमातून न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे शिवजयंती उत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. 

जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर मध्ये मोजक्या मित्रांनी एकत्र येऊन अमेरिकेमधील पहिल्या शिवजयंतीची सुरुवात केली. दरवर्षी त्यात वाढ होत गेली. ३ वर्षे भारतीय वकिलातीत मोठ्या सोहळ्यात रुपांतर झाले. 

याप्रसंगी केव्हिन थॉमस, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर, न्यूयॉर्क शहरातील लाँग आयलंड भागाचे प्रतिनिधित्व. सिनेट ग्राहक संरक्षण समितीचे प्रमुख, नागरी अधिकार अटॉर्नी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती फाऊंडेशन संस्थापक स्वप्नील खेडेकर (न्यूयॉर्क) हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

संगीता व निलेश इंगुळकर (केंटकी राज्य) यांनी पारंपरिक शिव पाळणा गीत व जिजाऊ वंदना सादर केली. छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद झेंडे यांनी प्रास्ताविक केले. 

या प्रसंगी छत्रपती फाऊंडेशन संस्थापक स्वप्नील खेडेकर, सांस्कृतिक कार्यदूत ए. के. विजयकृष्णन, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस, मिशीगन स्टेट हाऊस रिप्रेसेंटेटिव्ह श्री ठाणेदार आदी या प्रसंगी उपस्थित हाेते. 

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी प्रश्नोत्तरे भाग घेत, सर्वांशी दिलखुलास चर्चा केली. स्वतःच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी झिंझुर्डे (जॅक्सन, टेनेसी) यांनी तर अपार दळवी (बॉस्टन) यांनी आभार मानले. अभिनव देशमुख (अटलांटा) व ऋषीकश माने (पिटसबर्ग) यांनी डिजिटल टीमचे नेतृत्व करीत ऑनलाईन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची  मोलाची जबाबदारी सांभाळली सादर केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post