नगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने अंमलबजावणी कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. राहुरीमध्से विना मास्क फिरणार्यांवर पोलिस व महसूल यंत्रणेने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर लॉकडाऊन करावा लागेल असे स्पष्ट केलेले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक राबविणे सुरु केले आहे. राहुरी शहरात पोलिसांनी विना मास्क शहरात फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.
या कारवाईमुळे अनेकांची पळापळ सुरु झाली. पोलिस प्रशासनाने ही कारवाई मोहिम शहरात कायम राबवावी अशी मागणी होत आहे.
Post a Comment