लग्न साेहळ्याला आपल्या मित्र परिवारासह आप्तेष्ठांनी यावे, ही प्रत्येक वधू-वरासह त्यांच्या माता-पित्यांची इच्छा असते. जास्तीत जास्त जणांनी विवाहसाेहळ्याला उपस्थित रहावे, यासाठी प्रत्येकजण प्रत्यक्ष भेटून लग्नाचे निमंत्रण देऊन आग्रह करीत असतात. मात्र आता काेराेनाचा आकडा वाढू लागल्याने पत्रिका वाटप केलेल्या वधू-वराकडील मंडळींना लग्नाला उपस्थिती कमी रहावी, यासाठी प्रार्थना करण्याची वेळ आली असून अनेकांनी स्वयंपाकाचा बेतही मर्यादीत करून आप्तेष्ठांसह मित्र परिवाराला संदेश पाठवून आशिर्वाद संदेश रुपाने पाठविण्याची विनंती करण्याची वेळ आली आहे.
लग्न साेहळ्यातून दाेन कुटुंबाच्या नात्यांची नाळ जुळली जाते. ही जुळलेली नाळ अबाधीत राहण्यासाठी वधू- वराच्या परिवार प्रयत्नशील असतात. नव्याने जुळणार्या रेशीम गाठीच्या क्षणाच्या प्रसंगी थाेरा-माेठ्यांचे आशिर्वाद मिळावे, यासाठी प्रत्येकजण आपल्या मित्र परिवारासह आप्तेष्ठांनी सहभागी व्हावे, असे यासाठी निमंत्रण देत उपस्थिती रहाण्यासाठी आग्रह करीत असताे. तसे आग्रह अनेकांनी करून आपल्या भावाच्या बहिणीच्या व मुलाच्या लग्नाला यावे, असा आग्रह अनेकांना केलेला आहे.
आग्रहामुळे अनेकांनी काही झाले तरी आपल्याला लग्नाला जावे लागेल, यासाठी नियाेजनही करून ठेवले आहे. परंतु काेराेनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययाेजना कडक करण्यास सुरवात केली आहे. त्याचा धसका सगळ्यांनीच घेतलेलाआहे.
लग्नात नियम माेडल्याने विघ्न नकाे म्हणत अनेकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे नियमांची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचा निश्चय करून आपल्या प्रियजनांना लग्नाला उपस्थितीत मर्यादीत ठेवण्याची सूचना आहे. त्यामुळे आपण काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लग्नाला येण्याऐवजी समाजमाध्यमातून संदेश पाठवून शुभेच्छा द्याव्यात, असे संदेश पाठविण्यास सुरवात केलेली आहे.
काहींनी सगळ्यांनीच आपल्या घरातील विवाह साेहळ्याला उपस्थित रहावे, यासाठी समाजमाध्यमांचा वापर करून ऑनलाईन विवाह साेहळा पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियाेजन केलेले आहे.
उपस्थितीचे बंधन हे गरजेचे आहे. यामुळे पैशांची बचत होणार आहे. सद्यस्थिती बरोबरच आगामी कामासाठीही ही अट महत्वाची ठरणार असून पैसा व वेळेची बचत होणार आहे.
Post a Comment