लॉकडाऊनला टाळाण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करा...



नगर : लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.       

कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने आदी उपस्थित होते. 

या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल, पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागांना देण्यात आले.       


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post