नगर : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखेच्या नगर शाखेतर्फे निवेदन उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांना देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष संजय धामणे व कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे यांनी नुकतेच लेखी निवेदन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, आपसी बदली मिळालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता दिनांक बदल शिक्षकांच्या करंट मॅनेजमेंट डेट शाळा लॉगिनमधून अद्यावत करावा. तसेच अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे शाळा स्तरावर चार्ज कोणाकडे असावा, याबाबत एकसूत्रता येण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना याबाबत रीतसर लेखी निर्देश दयावेत, जेणेकरून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रशासन चालवताना एकसूत्रीपणा येईल ,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .
यावेळी संजय नळे ,गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सूदर्शन शिंदे, सरचिटणीस सीताराम सावंत, नगर तालुका शिक्षक समिती अध्यक्ष मधुकर मैड, कार्यालयीन चिटणीस विजय महामुनी, प्रकाश मुरकुटे, सलीम शेख, अंबादास मंडलिक, पदवीधर चे कार्याध्यक्ष सुनील नरसाळे, सुरेश कवडे, संतोष शिंदे, अतुल काकडे, प्रवीण थोरात, आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांनी सदर दोन्ही विषयांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
Post a Comment