उदयनराजे भाेसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची यांची वर्षा निवासस्थानी भेट  घेऊन सुमारे अर्धातास चर्चा केली. या चर्चेत मराठा आरक्षणासह इतर विषयांचा समावेश हाेता.

या भेटी दरम्यान, उदयनराजे भाेसले यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात एक निवेदनही दिले. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली हाेती.

उदयजनराजे यांनी मराठा आरक्षणाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालण्याची अशी विनंती केली. मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणा, हलगर्जीपणा करु नये अशा कडक सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय मार्गी लावावा, असे आवाहन भाेसले यांनी केले.

मराठा आरक्षणसंबंधी काही मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्यास राज्य सरकारला भाग पाडावे, जेणेकरुन समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असे अावाहन त्यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post