नगर ः चाेरटे आता काय चाेरतील याचा नेम राहिलेला नाही. धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविल्याच्या घटना शहरात घडत असतानाच अाता लहान मुलांच्या गळ्यातील साेन्याचे दागिने चाेरीच्या घटना घडू लागलेल्या अाहेत.
लहान मुलाच्या गळ्यातील 5 हजार 100 रुपये किंमतीचा सोन्याचा पत्ता चोरुन नेल्याची घटना नगर मधील सिध्दार्थनगर येथे सोमवारी (दि.15) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी गणेश
राजू कांबळे (वय 25, रा.सिध्दार्थनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लहान मुलगा घराबाहेर खेळत हाेता. त्याच्या गळ्यात गळ्यात 5 हजार
100 रुपयांचा सोन्याचा पत्ता होता. सदर मुलगा घरा बाहेर खेळत
असताना एकाने त्याच्या गळ्यातून दागिना चाेरून नेला.
या
प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गणेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम
379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक करत करीत
आहेत.
दरम्यान, गणेश कांबळे यांनी दागिना चाेरणार्या संशयिताचे नावही पाेलिसांना दिलेले आहे. त्यामुळे पाेलिस त्याला लवकरच अटक करतील,अशी आशा आता, कांबळे कुटुंबियांना लागली आहे.

Post a Comment