अभय आव्हाड प्रतिष्ठाणकडून हंडाळवाडीत जंतुनाशक फवारणी

पाथर्डी ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून संपूर्ण हंडाळवाडी गावात ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

जंतुनाशक फवारणीमुळे कोरोनाला आळा बसण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून हंडाळवाडीत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक काळजी म्हणून प्रत्येक गावकऱ्याची ऑक्सिजन लेव्हल व तापमानची तपासणी करण्यात आली.

प्रत्येकाला व्हिट्यामिन सीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानकडून वेळोवेळी आरोग्य तपासणी व जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हंडाळवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

यावेळी डॉ. पांडुरंग हंडाळ, आसाराम ठोंबरे, प्रमोद हंडाळ, विठ्ठल धस, बाळासाहेब हंडाळ, रावसाहेब कराळे, बाळू हंडाळ आदी उपस्थित होते. या अगाेदरही आव्हाड प्रतिष्ठानकडून असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा झालेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post