पाथर्डी ः शहरातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहून प्रशासनाने कोरोना लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यास सुरवात केली आहे. आज लसीकरणावेळी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. लस घेण्यासाठी कोरोना चाचणी केली जाते. याची चर्चा झाल्याने अनेकांनी लसीकरण केंद्रावर जाण्याचे टाळण्यास सुरवात झालेली आहे.
शहरातील जिल्हा परिषद शाळेत कोरोना लस देण्यात येत आहे. लसीचा
तुटवडा असल्याने प्रत्येकाची लस घेण्यासाठी धावपळ सुरु आहे. लस
घेणाऱ्यांच्या तुलनेत कोरोना लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात आसल्याने मोठ्या
प्रमाणावर लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी होऊन यामध्ये असलेला पॉझिटिव्ह
व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रसार करू शकतो.
खबरदारी म्हणून
कोरोना चाचणीच्या सुरु करण्यात आली आहे. यातून गर्दीला आळा बसेल पॉझिटिव्ह
व्यक्ती वेळेवर निष्पन्न होणार आहे. कोरोना संशयित असलेल्या व्यक्ती या
चाचणीच्या धास्तीने लस घेण्यास केंद्रावर जात नाही. मुबलक प्रमाणात लस
उपल्बध नसल्यामुळे लस मिळावी यासाठी पहाटेपासुनच नागरिक रांगेत उभे
असतात.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रुगणालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी धंनजय कोळेकर हे लसीकरण केंद्रावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
Post a Comment