सुभान तांबोळी यांच्या संकल्पनेतून उभारलेले आढळगावात काेविड सेंटर... पंचक्रोशीतून मदतीचा आेघ

 अमर छत्तीसे

श्रीगाेंदा ः वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर आढळगावमध्ये नीलेश लंके प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य), कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटिल बहुउद्देश्यीय संस्था, स्व. बन्शीलाल जवानमल नाहाटा चरिटेबल ट्रस्ट व स्व. दिलीप गांधी प्रतिष्ठान संचलित तसेच युवा नेते शरद जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली 50 बेडचे काेविड सेंटर सुरु केलेले आहे. श्री सिद्धेश्वर कोविड सेंटर आढळगाव या नावाने हे सेंटर 26 एप्रिल रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात चालू करण्यात आले. या सेंटरमधून आतापर्यंत 142 पैकी 106 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात यश आले आहे. सध्या 36 रुग्ण सक्रिय आहेत.

या सेंटरमधील प्रत्येक स्वयंसेवकाला एक जबाबदारी दिली. त्याप्रमाणे जो तो आपली जबाबदारी पूर्ण करण्याचापर्यंत करत असतो. त्यामध्ये दिनकर पंडित हे सेंटरचे सचिव या नात्याने सेंटरला आलेल्या वर्गनी व किरकोळ हिशोबची जबाबदारी त्याच्यांवर आहे, मनोज ठवाळ हे सेंटर मधील पेशेंट चे व स्वयसेकांचे जेवनाचे नियोजन पाहतात. तसेच या काळामध्ये लोक घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात. अशांमध्ये गवातील अर्चना जाधव, रेखा ठवाळ, सुनीता गव्हाणे या महिला सेंटरमध्ये जावून मदत करत आहेत. ते सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. 
 
सेंटरमधील रुग्णाला सकाळी चहा , नास्ता, दाेन वेळचे जेवन बनून देण्याचे काम यांच्याकडे आहे. सकाळी चहा बिस्किट, दाेन अंडी, काजू, बदाम, उपीट, गावरण तुपातील शिरा दुपारच्या जेवनामध्ये चपाती, सुकी भाजी, पातळ भाजी, वरण भात हे देण्यात येते. तसेच माऊली उबाले यांच्याकडे  सेंटरसाठी जे मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याने लागतात ती आण्याची जबाबदारी त्यांच्याकडे व यशवंत झगड़े यांच्यावर साेपविण्यात आलेली आहे. 

किरण बंड हा रुग्णांना मानसिक दृष्टिने मजबूत ठेवन्याचे काम करतो. सकाळी योगा घेणे, संध्याकाळी रुग्णांकडून व्यायाम करुन घेण्याचे काम त्याच्याकडे आहे. तसेच रुग्णाला जेवन देण्याचे काम करतो. त्यासाठी त्याला अकबर तांबोळी, पंडित दिनकर तसेच शरद जमदाडे हे चौकट सहकार्य करतात.
 
सुभान तांबोळी हे नीलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असून ते त्यांच्या गुरुंचा आदर्श घेऊन काम करत आहेत.  त्यांच्याकडे रुग्णांची जबाबदारी आहे. ते रुग्णाला सेंटरमध्ये  अॅडमिट करुन घेण्यापासून तर रुग्णाला डिस्चार्ज होईपर्यंत त्याच्या वर लक्ष देने तसेच पेशंट ला बेड ची व्यवस्था करणे, रुग्ण वार्ड ची साफ सफाई करणे , सेंटर परिसर सेनिडाइज़ करणे, रुग्णाला काही कमी जास्त त्याची काळजी घेणे, ज्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज आहे. त्याला बेड उपलब्ध करुण देणे, सेंटरमधून जाण्यासाठी रुग्णाला रुग्णवाहिकेची सोय करुन देणे यासाठी त्यांना माऊली उबाळे सहकार्य लाभते.या सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचे काम हे शरद जामदाडे व देवराव वाकडे.जिजाराम डोके हे करत आहेत.

आढळगाव व पंचक्रोशितील नागरिकांनी सेंटरसाठी भरभरून वर्गणी दिली आहे. त्यामध्ये कोकणगाव, भाउड़ी, वड़गाव, तांदळी, या गावांमधून पण मोठ्या प्रमाणात वर्गणी देण्यात आली आहे. आढळगावचे संदीप गुगले व सुरेंद्र गांधी यांनी सेंटरमधील रुग्णांच्या जेवनाची सर्व सोय त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे, सेंटरसाठी परदेशातून पण मदत आली आहे.

सेंटरसाठी सर्वात महत्वाची भूमिका डॉ. नेमीचंद निकम, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. कुमुदिनी शिंदे, डॉ. शिंदे हे सगळे सेंटरसाठी पूर्ण वेळ देऊन मोफत सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या अनुभवा प्रमाणे 106 कोरोना बाधित रुग्णाला कोरोनवर विजय संपादन करण्यात यश आले आहे. तसेच या सेंटरकडे आरोग्य विभागाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post