ग्रामीण पत्रकारांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचशिला गिरमकर यांचा पुढाकार... मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन...

अमर छत्तीसे
श्रीगाेंदा ः
  जिल्ह्यासह राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या काेराेनाच्या काळात पत्रकारांनी प्रशासनाला सहकार्य करून जीव धाेक्यात घालून वृत्तसंकलनाचे कामे केलेली असून अद्यापही ते करीत आहेत. या सर्व पत्रकार बांधवांचा फ्रंटवर्कमध्ये समावेश करून प्रशासनाने अगाेदरच लसीकरण करणे गरजेचे हाेते. मात्र ते झालेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य पंचशिला गिरमकर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात गिरमकर यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहे. ग्रामीण भागातील समस्या पत्रकार बांधव मांडून त्यांची साेडवणूक करून घेत आहे. हे करताना त्याची प्रशासनाला नेहमीच त्यांची साथ मिळालेली आहे. 
 
तसेच काेविडच्या काळात आराेग्य विभागाच्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन याच पत्रकार बांधवांनी त्यांच्या लेखणीतून गाैरव केलेला आहे. त्यामुळे आराेग्य विभागासह प्रशासनाच्या कामाला गती मिळण्यास मदत झालेली आहे.  
 
त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या अधिकारात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यासह मुख्य कार्यकारी अधिकार्यानी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. 
 
अहमदनगरच्या महापालिका प्रशासनाने शहरातील पत्रकारांसाठी निर्णय घेऊन लसीकरण केलेले आहे. तसेच आपण आपल्या ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी असा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी गिरमकर यांनी निवेदनात केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post