कर्जत ः कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षात कुकडी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला अाहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जतसह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टर पेक्षा जास्त
असणाऱ्या क्षेत्राला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतकरी देशोधडीला लागून
आर्थिक संकटात सापडून आत्महत्येची भाषा करीत आहेत. माजीमंत्री राम
शिंदे यांनी यांच्या काळात योग्य नियोजन करून नियमित कुकडीचे आवर्तन मिळवून
दिले होते. परंतु आता शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागा व पिके जळत असताना
तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यातील नेत्यांनी चालू उन्हाळी आवर्तन कुकडीच्या उपयुक्त साठ्यातून
त्यांच्या भागातील शेतीला पाणी घेऊन सर्व बंधारे भरून नगर जिल्ह्यातील
तालुक्यासाठी पाणी मिळण्याच्या वेळेला प्रशांत औटी यांनी न्यायालयात याचिका
दाखल करून आपल्या हक्काचे पाणी थांबवले. प्रशांत औटी यांच्यामागे कोण आहे,
याचा शोध घेणे गरजेचे आहे.
यात आणखी भर म्हणून जलसंपदा विभागातर्फे 28 डिसेंबर 2020 ला शासन निर्णय होऊन कुकडी लाभ क्षेत्रातल्या प्रत्येक लोक
प्रतिनिधीला आप-आपल्या मतदारसंघातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील
शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी व आपआपल्या भागाला
न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक मतदार संघातील अभ्यासू शेतकऱ्यांचा
प्रतिनिधी म्हणून कुकडीच्या सल्लागार समितीवर एक अशासकीय सदस्याचे नाव
सुचविण्यासाठी सूचना जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने नऊ एप्रिल 2021ला कुकडीच्या सल्लागार समितीच्या
बैठकीत चार विधानसभा सदस्यांनी आपापल्या मतदार संघातील अशासकीय सदस्यांची
नावे देऊन निवड केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव येथील
देवदत्त निकम यांची तर आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथील अशोक घोडके
यांची आमदार निलेश लंके यांनी कोहकडी (ता. पारनेर) येथील सुदाम पवार यांची तर
कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी श्रीगोंदा येथील
राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांची निवड केली.
या निवडी जलसंपदामंत्री
जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता ह. तु. धुमाळ यांच्या संयुक्त सहीने
निवड करण्यात आली.
कर्जत-जामखेड
तालुक्यात महाविकास आघाडीकडे पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फौज असताना
तालुक्यातील एकही प्रतिनिधी आमदार रोहित पवार यांना लायक वाटला
नाही? कुकडीच्या प्रश्नावर आवर्तनाच्यावेळी घनश्याम शेलार हे कर्जत
तालुक्याची का श्रीगोंदा तालुक्याची बाजू मांडणार? कर्जत तालुक्याला ते
न्याय मिळवून देतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच हे प्रश्न
कर्जत तालुक्यातील जनतेच्या व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात
संभ्रम निर्माण करणारे आहेत.
कुकडी सारख्या प्रश्नावर तालुक्यावर होणारा अन्याय आणि भविष्यात
अस्मितेचा प्रश्न यावर येणाऱ्या संकटाना परतवून लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध
असल्याचे पोटरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Post a Comment