बॅंकेची सभा आल्यावर विराेधक हाेतात आक्रमक... सभा आटाेपात बॅंकेवर आराेप प्रत्याराेप थांबतात...

एम. व्ही. देशमुख
नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची सर्वसाधारण सभा जवळ आल्यानंतर व सभा संपल्यानंतर काही दिवस विराेधकांकडून बॅंकेच्या कारभावर आराेप-प्रत्याराेप केले जातात. सभा आटाेपल्यानंतर मात्र हे आराेप-प्रत्याराेप कसे बंद हाेतात, असा सवाल आता बॅंकेच्या सर्वसाधारण सभासदांमधून उपस्थित केला जात आहे.
दरवर्षीत बॅंकेच सर्वसाधारण सभा ही हाेत असते. या सभेच्या अगाेदर आठ दिवस व त्यांतर आठ दिवस बॅंकेच्या कारभारावर विराेधकांकडून आराेप-प्रत्याराेप केले जात आहे. विराेधकांकडून हाेणाऱ्या आराेपाला सत्ताधाऱ्यांकडून तेव्हढ्याच ताकदीने उत्तर देऊन त्यांना विराेध पलटावून लावला जात आहे.

या आराेप-प्रत्याराेपाच्या फैरी सभेअगाेदर आठ दिवस व सभा आटाेपल्यानंतर आठ दिवस अशा एकूण साधारण पंधरा ते साेळा दिवस रंगत असतात. त्यानंतर बॅंकेचे कामकाज नियमितपणे सुरु असते. त्या कामकाजाला जणू विराेधकांची मूक संमती असल्या सारखेच वाटते. 

वर्षभर हाेणाऱ्या कारभारावर फक्त सभेच्या अगाेदर व सभेत तसेच सभेनंतरच का आराेप-प्रत्याराेप केले जातात. जेव्हा बॅंकेच्या कारभारात चुका हाेतात, तेव्हाच विराेधक त्यावर आवाज का उठवत नाहीत. बॅंकेच्या सर्वसाधारण सभेचीच का वाट पाहिली जाते, असे एक ना अनेक सवाल आता सभासदांमधून उपस्थित केले जात आहे.

प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत दरवेळी गाेंधळ का हाेताे याचे काेडे मात्र अद्याप सभासदांना उलगडलेले नाही. हा गाेंधळ एक करमणुकीचे साधन ठरत आहे. हे सर्वांना माहिती असूनही हा गाेंधळ का हाेताे, याचे उत्तर सत्ताधार्यांसह विराेधकांनी शाेधणे गरजेचे आहे. 

ज्ञानदानाचे काम करणाऱ्यांकडून अशा प्रकारचा गाेंधळ घालण्याचा प्रकार हाेणे म्हणजे समाजात आपली प्रतिष्ठा कमी कर्यासारखे आहे. तरी सुध्दा असा प्रकार सर्रासपणे हाेत आहे. हा प्रकार काेठे तरी थांबला पाहिजे, यासाठी आता सर्वांनी एक हाेत त्यावर ताे़डगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

बॅंकेच्या आॅनलाईन सभाही शांतेत हाेईल, अशी अपेक्षा सर्वांना हाेती. मात्र या सभेतही यंदाच्या वर्षी गाेंधळ झालेला आहे. हा गाेंधळ का झाला, नेमके काेणाचे चुकले, का चुकले याचा शाेध बॅंकेच्या संचालक मंडळाने घेणे गरजेचे आहे. मात्र त्यावर अद्यापही बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली नाही.हे विशेष.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post