निघोज ः गेल्या दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरमधून आजपर्यंत दहा ते पंधरा रुग्ण बरे होउन घरी गेले आहेत. तसेच सध्या पासष्ट रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या दहा दिवसांपूर्वी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन सदस्यांनी या
कोव्हिड सेंटरची कल्पना फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांना
सांगितली. त्यांनी लगेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार नीलेश लंके
यांच्याशी चर्चा केली. त्यांनी होकार देताच पारनेर येथील प्रशासकीय अधिकारी व
आरोग्य अधिकारी यांच्याशी रितसर चर्चा करीत रितसर परवानगी घेतली. अवघ्या दोन
दिवसांत कोविड सेंटर सुरू केले.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने या
कोव्हिड सेंटरसाठी मळगंगा भक्तीनिवास इमारत तसेच स्वयंपाकासाठी स्वतंत्र
असे कॅटिंन उपलब्ध करून दिले. सुसज्ज अशा इमारतीत शंभर बेडचे कोरोना सेंटर
सुरू करण्यात आले. गेल्या दहा दिवसांत बऱ्यापैकी लोकसहभागातून देणग्या
मिळाल्या असल्या तरी खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने संदीप पाटील
वराळ जनसेवा फाउंशनचे सदस्य व ग्रामस्थ बऱ्यापैकी ताळमेळ बसवण्याचे काम
होत आहे.
स्वतः सचिन वराळ पाटील, सुनील पवार हे रात्रंदिवस या ठिकाणी
थांबून व्यवस्था पहात आहेत. तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे सदस्य,
स्थानिक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, स्वयंसेवक रात्रंदिवस या
ठिकाणी काम पहात आहेत. निघोज आणि परिसरात कोरोना रुण्गांची संख्या
सातत्याने वाढत आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असली तरी घरीच उपचार घेत लोक
थांबत होते. मात्र कोरोना सेंटर सुरू झाल्याने लोकांनी त्या ठिकाणी जात
असल्याने रूण्गांच्या संख्येवर नियंत्रण आले तसेच सर्वसामान्य रुग्णांची
पैशाची बचत झाली आहे.
या ठिकाणी अतिषय उत्तम व्यवस्था केली असल्याने रूण्ग व
नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. कुणाचा वाढदिवस असो लग्न वाढदिवस
असो किंवा इतर सामाजिक शैक्षणिक संस्था, कुलाबा मुंबईकर मंडळ, निघोज व
परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात देणगीचा ओघ सुरू ठेवल्याने खर्चाचे अंदाजपत्रक नियंत्रित ठेवण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज
ग्रामस्थ यांना कसरत करावी लागत आहे.
या कोव्हीड सेंटरसाठी सचिन पाटील
वराळ, सुनिल पवार , अस्लम इनामदार, कैलास जगताप, सौरभ वराळ, संतोष वराळ,
रावसाहेब वराळ, मंगेश वराळ, आकाश वराळ, साजिद तांबोळी, शैलेश वराळ, अतुल
कारकुड, अक्षय वराळ, प्रतिक वराळ, नीलेश खोबरे, गोविंद पवार, अविनाश वराळ,
स्वप्नील आतकर, नवीन गायकवाड, सुरेश वराळ, मयांक वराळ, राजू वराळ, विलास
वराळ, श्रीकांत पवार, विलास हारदे, अप्पा वराळ, ठकाराम गायखे आदी सहकारी
या ठिकाणी परिश्रम घेत आहेत.
संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज
ग्रामस्थ याठिकाणी कोरोना रुण्गांची देवदूतासारखी सेवा करीत असल्याचे चित्र
या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
संदीप
पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरचे उदघाटन आमदार नीलेश लंके
यांच्या हस्ते करण्यात आले. आजपर्यंत या ठिकाणी प्रांताधिकारी सुधाकर भोसले,
गटविकास अधिकारी किशोर माने तसेच अधिकारी पदाधिकारी विविध सामाजिक संस्था
ग्रामस्थ यांनी भेटी देऊन सुसज्ज हॉस्पिटलसारखे हे कोविड सेंटर असून
या ठिकाणी खऱ्या अर्थानं रुण्गांची सेवा होत असल्याचे गौरवोद्गार
मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
Post a Comment