वयाची 59 वर्षे पूर्ण केलेले व्यक्तीमत्व निघाेज पट्ट्यात लहानांपासून थाेरांपर्यंत परिचित असलेले नाव दत्ता उनवणे आहे. सदैव हसतमुख व दुसऱ्यांना मदत करणे या वृत्तीमुळे हे उनवणे यांचे नाव सर्वांच्यात सदैव मुखी असते. 59 वर्षात गेली 30 वर्षे या माणसाने पत्रकारितेत भरिव काम केलेले आहे. त्यामुळे सर्वांच्यात परिचित हे नाव अाहे.
नेहमीच हसममुख असलेल्या दत्ता उनवणे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून निघाेज परिसरात अनेक विधायक कामे केलेली आहे. चांगल्या कामाला सदैव प्रसिध्दी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील असतात. स्वतःचा प्रपंच पाहून त्यांनी पत्रकारितेचा घेतलेला वसा आजही ते यशस्वीपणे संभाळत आहे.
59 वर्षातील त्यांच्या कामाची लगबग पाहून नव्याने आलेल्या पत्रकारितेतील तरुणांना ते मार्गदर्शन ठरत आहे. नव्याने पत्रकारितेत येणाऱ्यांना सदैव आपल्या अनुभवाची शिदाेरी देऊन ते त्यांना खांद्याला खांदा लावून चालायला लावित आहेत.
गावात लहान्यांपासून थाेरांपर्यंत प्रत्येकाला येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना याेग्य मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे गावाबराेबरच पंचक्राेशित दत्ता उनवणे यांना कामामुळे आेळखले जात आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांना गावपुढाऱ्यापासून थेट आमदार खासदारही नावाने आेळखत अाहेत.
नेते मंडळी गावात आल्यानंतर अनेकदा दत्ता उनवणे नाही आले का असे अनेकदा विचारणा हाेत असलेले प्रसंग घडलेले आहे. त्यांच्यातील सामाजिक काम करण्याच्या पध्दतीमुळेच ते सर्वांच्या परिचित व कायम लक्षात राहणारे व्यक्तीमत्व आहे.
अशा या महान व्यक्तीमत्वाला तेजवार्ता वेबसाईटतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उनवणे यांच्याकडून असे सदैव समाजहिताचे काम हाेत राहाे. ही अपेक्षा...
Post a Comment