पुणे : खासगी शाळांकडून सातत्याने वाढवण्यात येत असलेल्या शुल्काविरोधात शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये निदर्शने करण्यात आली.
शाळांनी सुरू केलेली शुल्कवाढ त्वरित थांबवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली . 'भाजयुमो'चे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रतीक देसर्डा, राजू परदेशी, दीपक पवार, अक्षय वायाळ, करण मिसाळ, ओंकार केदारी , अँड. मनीष पाडेकर, सुनील मिश्रा, अभिजित राऊत यांनी सहभाग घेतला होता.
शुल्क न भरण्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये ; तसे आढळून आल्यास शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शाळेवर कारवाई करावी, शुल्क भरण्यासाठी सुलभ हप्त्यांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, उशिराने शुल्क भरणाऱ्या पालकांकडून दंडाची रक्कम वसूल करू नये, ज्या सुविधा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात वापरल्याच नाहीत, अशा सुविधांची रक्कम शुल्कातून कमी करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Post a Comment