चिंता वाढविणारा बाधितांचा आकडा... शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आकडा वाढला...


नगर : जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यांच्या अंतराने मोठा दिलासा मिळात आहे. रोज दन हजाराच्या पुढे बाधितांचा आकडा येत होता. शुक्रवारी तर दीड हजाराच्या आत आला होता. आज शनिवारी दीड हजाराच्या पुढे हा आकडा गेला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1588 नवीन बाधित आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 479, खासगी तपासणीत 530 व रँपिड तपासणीत 579 बाधित आढळून आलेले आहेत. 

यामध्ये महापालिका हद्दीतही 69 नवीन बाधितांची भर पडली आहे. हा शहरवासीयांना दिलासादायक आकडा आहे. शेवगाव तालुक्यात रुग्ण आढळून आलेले आहेत. 

शेवगावमध्ये 182 जण आढळून आलेले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात दुसर्या क्रमांकाची आकडेवारी आढळून आली आहे. श्रीरामपूरमध्ये 170 रुग्ण आढळले आहेत. पारनेर तालुक्यात तिसर्या क्रमांकाची रुग्ण संख्या आढळून आली आहे. पारनेरमध्ये 142 रुग्ण आढळले आहेत.

शुक्रवारी जिल्ह्यात 1408 रुग्ण आढळून आले होते. आज (शनिवारी) 1588 रुग्ण आढळून आलेले आहेत. कालच्या तुलनेत आज तब्बल 180 रुग्ण अधिक आढळून आलेले आहेत. हा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post