मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक नियमावली कडक करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेशी आज संवाद साधताना करण्यात आलेल्या नियमावलीत शिथिलता देता की जैसे थे ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाची दुसर्या लाटेने राज्यात हाहाकार उडवून दिलेला होता. त्यामुळे राज्यात कडक नियमावली करण्यात आली होती. त्याची मुदत 31मेला संपत आहे. त्यामुळे एक जून नंतर लॉकडाउन जैसे थे राहणार की त्यातील काही नियमात शिथिलता येणार का याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहेत.
राज्यात करण्यात आलेल्या नियमावलीत शिथिलता आणून पूर्ववत व्यवहार करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री रात्री आठ वाजता जनतेशी समाज माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment