नगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आता कमी होऊ लागलेला आहे. शनिवारी जिल्ह्यात 1588 बाधित आढळून आले बोते. त्यात 148ने घट झाली असून बाधिताचा आकडा दीड हजाराच्या आत आल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1440 नवीन बाधित आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 465 खासगी तपासणीत 577 व रँपिड तपासणीत 398 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतही 58 नवीन बाधितांची भर पडली आहे.
हा शहरवासीयांना दिलासादायक आकडा आहे. नेवासा तालुक्यात रुग्ण आढळून आलेले आहेत. नेवासामध्ये 187 जण आढळून आलेले आहेत.
शेवगाव तालुक्यात दुसर्या क्रमांकाची आकडेवारी आढळून आली आहे. शेवगावमध्ये 182 रुग्ण आढळले आहेत. पाथर्डी तालुक्यात तिसर्या क्रमांकाची रुग्ण संख्या आढळून आली आहे. पाथर्डी 120 रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यात 1408, शनिवारी 1588 आज रविवारी 1440 रुग्ण आढळून आलेले आहेत.
Post a Comment