नगर ः जिल्ह्यात काेराेनाने थैमान घातलेले अाहे. राेज नव्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहराबराेबरच ग्रामीण भागातही आता काेराेना पाेहचलेला आहे. त्यावर मात करण्यासाठी आराेग्य विभागाने कंबर कसलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये काेराेनाच्या चाचण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र या चाचण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे झाडाच्या सावलीला या तपासण्या केल्या जात आहे. हे चित्र पाहिल्यानंतर माणसांना तपासतात की जनावरांना असा प्रश्न पडत आहे आराेग्य विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे सर्व हाेत असल्याने नारिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काेराेनाने जिल्ह्यात सध्या धुमाकूळ घातलेला असून राेज बाधितांची संख्या वाढत आहे. सध्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड उपलब्ध हाेत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून हाेत आहे. काहींना बेड उपलब्ध न झाल्याने त्यांना रुग्णालयाच्या आवारात आपला जीव गमविण्याच्या घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत. काेराेनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरी ते अपुरे ठरत आहे. या प्रयत्नांवर स्थानिक अधिकारी व कर्मचारी पाणी फिरवित आहे. याला काही ठिकाणी आराेग्य कर्मचारीही जबाबदार आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी दहापासून उन्हाची तीव्रता जाणवायला लागते. जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र व काेराेना तपासणी संकलन केंद्रांवर रुग्णांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मिळेल, त्या सावलीचा आधार घेत अनेक तपासणी लसीकरणासाठी नंबर लावून थांबत आहेत. परंतु ही परिस्थिती पाहूनही आराेग्य कर्मचारी सावलीची व्यवस्था करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.
जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रावर झाडाच्या सावलीचा आधार घेत रुग्णांची अॅंटीजेनतपासणी केली जात आहे. या ठिकाणी एक खुर्ची व एका टेबलची व्यवस्था करण्यात येऊन तेथेच तपासण्या केल्या जात आहे. यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी आराेग्य विभागाने आपल्या कारभारात सुधारणा अद्याप केलेली नाही.
ग्रामपंचायतकडून व्यवस्था हाेईना
आराेग्य केंद्रांमध्ये मंडप टाकून सावलीची व्यवस्था करणे महत्वाचे आहे. ही व्यवस्था आराेग्य विभागाने करायची की ग्रामपंचायतने हा तिढा अद्याप काही ठिकाणी सुटलेला नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तपासणीसाठी उन्हातान्हात बसून राहत आहेत.
पाण्यासाठी अनेकजण व्याकूळ
बसण्यासाठी सावली नाही, पिण्यास पाणी नाही. त्यामुळे अनेकांना पाणी पाणी करत तपासणीचा नंबर येईपर्यंत बसून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे लसीकरण व तपासणीची वेळच निश्चिचत नसल्याने रुग्णांना तास न् तास ताटकळत बसावे लागत आहे.
Post a Comment