राहाता ः राहाता बाजार समितीत गुरुवारी कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एकूण बारा हजार कांदा गाेण्यांची आवक झाली. बुधवारपेक्षा गुरुवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या भावात 100 रुपये प्रतिक्विंटलने भाव वाढ झाली हाेती.
राहाता बाजार समितीत गुरुवारी 12 हजार 302 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. राहात्यात कांद्याला पुढील प्रमाणे भाव मिळाला. एक नंबर कांद्याला एक हजार ते 1500, दाेन नंबर कांद्याला 650 ते 950, तीन नंबर कांद्याला 300 ते 600, गाेल्टी कांद्याला 700 ते 900, जाेड कांद्याला 100 ते 250 रुपयांचा भाव मिळाला.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी राहात्यात कांद्याला 100 रुपयांनी भाव वाढ मिळाला हाेता. मागणी वाढली की कांद्याच्या भावात वाढ हाेत असल्याचे शेतकऱ्यांमधून बाेलले जात आहे.
Post a Comment