श्रीगाेंदे ः ज्याचा वशिला त्याचं कुत्र... या म्हणीचा प्रत्यय आता जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर अनेकांना येऊ लागलेला आहे. ज्याचा दांडगा वशिला आहे. त्यांना प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे या लाेकांची अॅंटीजेन तपासणीही न करताच त्यांना लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व वशिल्याची मंडळी सरकारी वाहनातून बसवून आणून त्यांचे लसीकरण विना नंबर करून घेतले जात आहे. मात्र इमाने इतबारे नंबर लावून बसणाऱ्यांना लसीविनाच घरी परतावे लागत आहे.
केंद्रावरील गाेंधळाला आराेग्य विभागाच जबाबदार आहे. आराेग्य विभागाच्या सावळागाेंधळ कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्यांन भाेगावा लागत आहे. या कारभारात सुधारणा हाेणे गरजेचे आहे. सध्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिक गर्दी करू लागलेले आहेत. पूर्वी लस घ्या म्हणून आवाहन करूनरीह आराेग्य विभागाला काेणी साथ देत नव्हते. मात्र आता आराेग्य विभागाला आवाहन न करताही नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटल्यामुळे लसीकरणासाठी गर्दी करू लागलेले आहे.
पहिल्या टप्प्यात फ्रंटवर्क यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. त्यावेळी काहींनी आपल्या कुटुंबियांनाही लसीकरण करून घेतले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनासाठी लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. आता 18 ते 44 वयाेगटासाठी लसीकरण सुरु करण्यात आलेले हाेते. मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने पुन्हा लसीकरण केंद्रावरील 18 ते 44 वयाेगटातील लसीकरण बंद करण्यात आलेले आहे. मात्र या गटातील नागरिकांनाही लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. यासाठी वशिला महत्वाचा आहे.
वशिला बहाद्दरांमुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर सावळा गाेंधळ हाेत आहे. यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही घडत आहे. नुकतेच आढळगावातील लसीकरण केंद्रावरही असाच काहीसा प्रकार घडलेला आहे. असेच प्रकार सध्या जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये आराेग्य विभागाचे कर्मचारी राजकीय दबावाला बळी पडून वशिला असणाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करीत आहेत. हा प्रकार नगर महापालिकेसह ग्रामीण भागात सर्रास सुरु आहे.
शासकीय नाेकरीत असलेले काही अधिकारी आपल्या कुटुंबिय व नातेवाईकांसह शेजारी राहणाऱ्यांचे लसीकरण वशिल्याच्या जाेरावर करून घेत आहेत. विशेष म्हणजे हे लसीकरण करताना संबंधितांन शासकीय वाहनातून आणून त्यांचे लसीकरण केले जात आहे. या वेळी संबंधित अधिकारी स्वतः उपस्थित राहून हे काम करून घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी तपासणीसाठी आपल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र ते आपल्या कुटुंबिय व नातेवाईकांना लसीकरणासाठी घेऊन आलेले असल्याचे चित्र असते.
एका अधिकाऱ्याने केला अधिकाराचा गैरवापर
एका अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत कुटुंबिय व नातेवाईकांना लसीकरणासाठी घेऊन लसीकरण करून नेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील एका लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडलेला असून त्याची चर्चा सध्या साेशल मीडियावर सुरु आहे.
Post a Comment