नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असल्याने सर्वांना दिलासा मिळालेला असला तरी कोरोनाने मृत्यू होणार्याचा आकडा मात्र वाढत चालला आहे. दिवसभरात तब्बल 96 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर दोन हजार 746 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूदर वाढत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची बाब झाली आहे.
जिल्ह्यात आजअखेर कोरोना बाधितांची एकूण संख्या दोन लाख 46 हजार 665 झाली आहे. दिवसभरात 1856 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 140, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 869, अँटिजेन चाचणीत 847 रुग्ण आढळून आले.
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेरात दिवसभरात आज 354 रुग्ण आढळून आले. सर्वांत कमी केवळ एक रुग्ण भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत आढळला. जिल्ह्यात सध्या 16 हजार 315 रुग्णंवर उपचार सुरु आहेत.
दिवसभरात तीन हजार 48 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.27 टक्के झाले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या
संगमनेर 354, अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148, नगर शहर 126, पारनेर व पाथर्डी प्रत्येकी 116, नगर तालुका 95, नेवासे 92, कर्जत 91, राहाता 86, श्रीगोंदा 76, कोपरगाव 69, शेवगाव 47, जामखेड 28, भिंगार छावणी परिषद एक. बाहेरील जिल्ह्यांतील 22.
Post a Comment