ईश्वरसेवा करुनच कोरोनाला हद्दपार करु शकतो... डॉ. राजेश थोरात व स्वाती थोरात यांनी लग्नाचा वाढदिवस कोरोना सेंटरवर साजरा


पारनेर : कोरोना ही महामारी असली तरी तिचा मुकाबला करीत आपण ‌ईश्वरसेवा करुनच कोरोनाला हद्दपार करु शकतो, असा विश्वास विलास महाराज लोंढे यांनी प्रवचनाच्या माध्यमातून दिला आहे. 

संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोव्हिड सेंटरमध्ये लोंढे महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

लोंढे महाराज म्हणाले की, गेली पंधरा दिवसांपासून संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांचे सहकारी याठिकाणी रात्रंदिवस कोरोना रुण्गांची सेवा करीत आहेत. देवदूतासारखे त्यांचे काम आहे. कोरोनाने जगाला माणुसकी शिकवली आहे.

कोरोना झाल्यानंतर घरातील माणसे सुध्दा त्या व्यक्तीला हात लावत नाहीत. मात्र संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी या कोरोना सेंटरमध्ये हॉस्पिटलमधील सेवा उपलब्ध केली आहे. 

यावेळी लोंढे महाराज यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्यावतीने फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोना रूण्गांना जसा औषध उपचार महत्वाचा आहे. त्याप्रमाणेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आपण बरे होणार ही त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांचे सहकारी सर्वप्रकारचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

योगशिक्षक विलासराव हारदे योग वर्ग घेत आहेत सामाजिक व सेवाभावी व्याख्यान माध्यमातून सुनिल पवार त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक मार्गदर्शन करण्यासाठी विलास महाराज लोंढे यांचे प्रवचन झाले. 

अशाप्रकारे हे रुग्ण बरे होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत .या कोव्हिड सेंटरमध्ये ८० रुग्ण उपचार घेत असून गेली पंधरा दिवसांत ६५ रुग्ण उपचार घेउन घरी गेले आहेत जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या या कोव्हिड सेंटरमुळे निघोज व परिसरातील अनेक गावांतील रुण्गांना आधार मिळाला आहे. 

मळगंगा भक्तीनिवास या सुसज्ज इमारतीमध्ये स्वतंत्र खोल्या उपलब्ध असल्याने शंभर बेडच्या माध्यमातून रुण्गांची चांगली व्यवस्था होत आहे.  

 या कोव्हिड सेंटरमध्ये डॉ राजेश थोरात, डॉक्टर अरुण थोरात,डॉ संदेश थोरात, डॉक्टर अनिकेत थोरात आरोग्य सेविका सुमन शेटे सुमित्रा कवाद, आदी वैद्यकीय सेवा देत आहेत. तसेच सरपंच चित्रा सचिन वराळ पाटील, संदीप पाटील वराळ , सुनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, ग्रामपंचायत सदस्या शबनुर इनामदार, अस्लम इनामदार, रावसाहेब वराळ, कैलास जगताप, सौरभ वराळ, संतोष वराळ, मंगेश वराळ, आकाश वराळ, साजिद तांबोळी, शैलेश वराळ, अतुल कारकुड,अक्षय वराळ, प्रतिक वराळ, निलेश खोबरे, गोविंद पवार, अविनाश वराळ, स्वप्नील आतकर, नविन गायकवाड, सुरेश वराळ, मयांक वराळ, राजू वराळ, विलास वराळ, श्रीकांत पवार, विलासराव हारदे, आप्पासाहेब वराळ, ठकाराम गायखे, स्वप्नील वराळ, आयुष वराळ,अथर्व वराळ आदी  परिश्रम घेत आहेत.

डॉक्टर राजेश थोरात व त्यांचे सुपुत्र डॉ संदेश थोरात हे सातत्याने या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहेत डॉक्टर राजेश थोरात यांनी लग्नाचा वाढदिवस सुद्धा याठिकाणी साजरा केला. यावेळी त्यांच्या पत्नी स्वातीताई थोरात यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना रुण्गांना आमरसाचे स्वादिष्ट जेवण देऊन लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद कोरोना रुण्गांबरोबर साजरा केला.

कोरोना रुण्गांची संख्या जास्त असल्याने रोजचा खर्च जास्त आहे. लोकसहभागातून देणग्या मिळण्याचे प्रमाण सुरुवातीला बऱ्यापैकी होते.गेली चार दिवसात देणग्यांचे प्रमाण कमी झाले असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन ला कसरत करावी लागत आहे. यासाठी या कोव्हिड सेंटरला देणग्या देण्याचे आवाहन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post