पारनेर : शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजूरकर यांनी आज (शनिवारी) कुंड पर्यटनस्थळी असलेल्या संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला भेट दिली.
यावेळी डॉ. राजूरकर यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर विक्रम वराळ यांनी डॉ. राजूरकर यांना या कोव्हिड सेंटरला भेट देण्यासाठी आवर्जून निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी आज भेट देऊन येथील पहाणी केली. यावेळी डॉक्टर विक्रम वराळ, सुनिल पवार, सुनिल वराळ पाटील, डॉ. संदेश थोरात, आरोग्य सेविका सुमन शेटे आदी उपस्थित होते.
डॉ. राजूरकर यांनी कोविड सेंटरला भेट देऊन व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच डॉक्टर विक्रम वराळ यांचे कौतुक केले. हॉस्पिटलमधील सुविधा तुम्ही या ठिकाणी देत असून मी अनेक कोव्हिड सेंटरला भेटी दिल्या. मात्र निघोज येथील कोव्हिड सेंटर अतिशय सुसज्ज असे असल्याचे त्यांचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Post a Comment