पाथर्डी : शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील भगवाननगर फुलेनगर, आसरानगर, शंकरनगर, दत्तनगर या उपनगरातील सुमारे दोनशे नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात चारजण बाधित आढळून आले.
यावेळी तहसीलदार शाम वाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे आदी उपस्थित होते. यावेळी रॅपिड अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चार नागरिक कोरोना बाधीत आढळून आल्याने त्यांना तात्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पालवे व मनसे विधी व जनहित चे जिल्हाध्यक्ष प्रविण वाघमारे व विनय बोरूडे यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये स्वतंत्रपणे कोरोना चाचणी व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात यावे, या मागणी करिता पालिका प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
या मागणीची दखल घेत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालयीन अधीक्षक आयुब शेख, सोमनाथ गर्जे, लक्ष्मण हाडके, संगणक अभियंता सोमनाथ धरम, संजय खोर्दे, नवनाथ आमले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हनुमंत वाघमारे, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने प्रभाग क्रमांक सहामधील भगवान नगर येथील भगवान उद्यान येथे सुमारे दोनशे नागरिकांची रॅपिड अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी केली.
मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पालवे यांनी नागरिकांना घरोघरी जाऊन चाचणी करण्यासाठी बोलावून प्रवृत्त केले. या शिबिराच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चहा, पाणी, नाष्टा व आवश्यक ते साहित्य देऊन सहकार्य केले.
Post a Comment