स्त्री जातीचे अर्भक आढळले.... पोलिसांकडून तपास सुरु...


नेवासा : तालुक्यातील कौठा शिवारात  उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्त्रीभृण हत्या की इतर काही कारण आहे. याबाबत सध्या तर्कवितर्क लढविले जात आहे.

कौठा महालक्ष्मी हिवरा रस्त्यावरील शिवारातील उसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी संबंधित शेतकरी गेल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबतची खबर सोनई पोलिस ठाण्यासह आरोग्य विभाग तसेच गावातील प्रमुखांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत आरोग्य विभागाचे पथकही हजर झाले होते . आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी बाळाची पाहणी केली असता हे बाळ मृत घोषित करण्यात आले.  

हे मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी नेवासा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही स्त्रीभ्रृण हत्या की इतर काही कारण आहे. या विषयी ग्रामस्थात तर्कवितर्क लढविले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post