श्री वृध्देश्वरच्या इथेनॉल प्रकल्पाची वेळेत उभारणी करु.... कर्मचार्यांना दहा दिवसांचा पगार बक्षीस... संचालक राहुल राजळे यांचे प्रतिपादन...


पाथर्डी : श्री वृध्देश्वर कारखान्याच्या डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पास शासनाकडून आर्थिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. इथेनॉल प्रकल्पाची उभारणी वेळेत पूर्ण करावयाची आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन यार्षीचा गळीत हंगाम यशस्वी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना १० दिवसांचा पगार बक्षीस देणार आहे, प्रतिपादन संचालक राहुल राजळे यांनी केले.

तालुक्याची कामधेनू असलेल्या व आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०- २१ वर्षीच्या यशस्वी गळीत हंगाम सांगता  कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

कोवीड- १९ च्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात झाला. त्यावेळी राहुल राजळे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक सुभाषराव ताठे, सुभाषराव बुधवंत, बाबासाहेब किलबिले, शरद अकोलकर, डॉ. यशवंत गवळी, बाळासाहेब गोल्हार,शेषराव ढाकणे, अँड. अनिल फलके, कुशिनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, सरव्यवस्थापक भास्कर गोरे, सहाय्यक सचिव रवींद्र महाजन, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, चिफ अर्कोटंट संभाजी राजळे, कार्यालयीन अधीक्षक आदिनाथ राजळे, जनसंपर्क अधिकारी अंकुश राजळे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ म्हणाले की, कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये अनेक अडचणीवर मात करून पाच लाख एकवीस हजार टन उसाचे गाळप करुन पाच लाख एकावन्न हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याची अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळातही कायम राहिल. 

यावेळी सेवानिवृत्त झालेल्या १९ कर्मचाऱ्यांचा सपत्नीक व हंगामामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व उपस्थित संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जे. आर. पवार यांनी केले. संचालक श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post