नगर : गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडा वाढता होता. मात्र हा आकडा आज (गुरुवारी) दोन हजाराच्या आत आल्याने सर्वांना दिलासा मिळालेला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली होती. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडा कमी होऊ लागलेला आहे.
जिल्ह्यात आज दिवसभरात 1610 बाधित आढळून आलेले आहे. जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 201, खासगी तपासणीत 73 व अँटीजेन तपासणीत 671 जण बाधित आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात नेवासा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. नेवाशात 187जण आढळून आलेले आहेत. दुसर्यास्थानी संगमनेर तालुक्याचा नंबर लागत आहे. संगमनेरात 127 रुग्ण आढळून आलेले आहेत. तिसर्यास्थानी राहुरी तालुक्याचा नंबर असून राहुरीत दिवसभरात 126 बाधित आढळून आलेले आहेत.
Post a Comment