मुंबई : यास चक्रीवादळाचा आतापर्यंत सर्वात जास्त तडाखा पश्चिम बंगाल व ओडिशाला बसला आहे. या दोनही राज्यातमध्ये मिळून 15 लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला आहे. या यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
यास चक्रीवादळामुळे अनेक झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहे. त्यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
याचा फटका कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Post a Comment