नॅनो युरिया कृषि उत्पादनवाढीसाठीचा नवीन आविष्कार ठरेल... कुलगुरु डॉ पाटील यांचे प्रतिपादन...


राहुरी : नॅनो युरिया हा कृषी उत्पादनवाढीसाठीचा नवीन आविष्कार ठरेल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. 

नॅनो युरियाचे महत्त्व व उपयोग या विषयावरील इफकोने आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ. रमेश रालिया, महाप्रबंधक, नॅनोटेक्नॉलॉजी, इफको कलोल व संशोधक, सेंट लुईस वॉशिंग्टन विद्यापीठ, अमेरिका, योगेंद्र कुमार, विपणन संचालक, इफको, नवी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, कृषी क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने आहेत. आपल्या देशात सरासरी 130 किलो प्रति हेक्टरी एवढा युरियाचा वापर होत असतो. वर्षभरात सुमारे 50 लाख टन युरियाची आपल्याला आवश्यकता आहे. परंतु, नॅनो युरियामुळे आयातीवरील खर्च कमी करता येईल. याशिवाय युरिया मात्राची परिणामकारकता वाढवून पीक उत्पादनासाठी याची मदत होईल. 

सुमारे 94 वेगवेगळ्या पिकांवरील प्रयोग करून आणि अकरा हजार शेतकर्यांच्या शेतावर या नॅनो युरियाची प्रात्यक्षीके घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व इफको यांच्यातील समन्वयाने नॅनो खत व्यवस्थापनातील तंत्रज्ञान तयार करण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. योगेंद्र कुमार यांनी इफकोचे कृषी क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. रमेश रालिया यांनी नॅनो युरियाचे महत्त्व आणि उपयोग यावर मार्गदर्शन केले.  डॉ. एम. एम. पोवार यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post