वडनेर बुद्रुक उपकेंद्रात दुसऱ्या सत्रात 193 नागरिकांचे लसीकरण... ग्रामसमृद्धी फाउंडेशनतर्फे मास्क व अल्पोपहार...


वडनेर : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक आरोग्य उपकेंद्रात दुसऱ्या सत्रात ४५ वर्षे वयापुढील १९३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

यावेळी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर इतर नागरिकांना पहिला डोस दिला गेला.

दहा मेला पाहिल्या सत्रात १०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यावेळी केलेल्या नियोजनाचा अनुभव पाठीशी असल्याने या वेळी नागरिकांची संख्या जास्त असूनही उत्तम प्रकारचे नियोजन वडनेरकरांनी करून लसीकरण यशस्वी केल्याबद्दल आरोग्य अधिकारी श्प्रकाश लाळगे यांनी ग्रामपंचायत आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. पुढील वेळेसही जास्तीत जास्त डोस उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते म्हणाले. 

आरोग्य सहाय्यक वसंत श्रीमंदिलकर यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्यातर्फे डॉ. प्रकाश लाळगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी साडेपाच वाजल्यापासून रांग लावली होती. शारीरिक अंतर ठेवून, मुखपट्टी परिधान करून नागरिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घेतले. 

यावेळी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना ग्रामसमृद्धी फाउडेशनतर्फे अल्पोपहार व मास्कचे वाटप केले गेले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे वसंत श्रीमंदीलकर, डॉ. प्रविण नरसाळे, रईसा शेख, विशाल चौधरी, मीरा रसाळ, विद्या भालेकर, अलका वाजे, संगिता भालेकर यांनी लसीकरणाचे काम पाहिले.

लसीकरण यशस्वी होण्यासाठी सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश वाजे, आशा चौधरी, रेखा येवले, स्वातीताई नऱ्हे, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे, ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे विकास वाजे, सोपान येवले, उत्तम बाबर, गणेश कटारिया, राहुल नऱ्हे, गोरक्ष सुकाळे, विक्रम सुकाळे, चंद्रकांत सुकाळे, शिवाजी पवार, ग्रामपंचायत कर्मचारी शेखर थोरात, धनंजय वायदंडे आदींनी परीश्रम घेतले.

वडनेर ग्रामपंचायत पदाधिकारी असोत किंवा वडनेर व परिसरातील ग्रामसमृद्धी फाउंडेशन असो सामाजिक कामांसाठी हे पदाधिकारी सर्वात पुढे असतात. वडनेर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांनी आठ हजार 100 रूपयांची देणगी निघोज येथील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोव्हिड सेंटरला दिली आहे. 

तसेच ग्रामसमृद्धी फाउंडेशनने चार बेडची व्यवस्था करुन दिली आहे. अशा प्रकारे लसीकरण बरोबरच कोरोना रुण्गांची काळजी घेण्यासाठी या संस्थांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post